दिव्यांग संस्थेच्या वतीने पिवळे रेशन कार्डाचे वाटपाचे कार्यक्रम यशस्वी - Voice of Divyang

Followers

Advertisement

Slideshow


दिव्यांग संस्थेच्या वतीने पिवळे रेशन कार्डाचे वाटपाचे कार्यक्रम यशस्वी


दिव्यांग संस्थेच्या वतीने पिवळे रेशन कार्डाचे वाटपाचे कार्यक्रम यशस्वी

 मालेगांव, शहराचे सर्व अपंग व्यक्ती ज्यांचा केशरी रेशन कार्ड होता, अश्या सर्व अपंगांचे अर्ज सन 2019 मध्ये दिव्यांग संस्थेच्या तर्फे मालेगांवचे एफ डी ओ डिपार्टमेंट मध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवार 28 मार्चला किदवाई रोड स्कुल नं.1 मध्ये दिव्यांग संस्थेच्या वतीने एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्याची अध्यक्षता लायन्स क्लब ऑफ मालेगांवचे चेअरमन श्री.राजु मामा यांनी केली. त्या कार्यक्रमात एफ डी ओ डिपार्टमेंटचे सर्व अधिकाऱ्यांशिवाय ॲडी.एस.पी. चंद्रकांत खांडवी, डी.वाय.एस.पी.लता धोंडे, तहसिलदार चंद्रजीत राजपुत, सिटी पोलिस स्टेशन पी आय घोसर व किल्ला पोलिस स्टेशनचे पी आय दिगम्बर बधाणे साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलविण्यात आले होते. दिव्यांग संस्थेच्या वतीने अनस वॉच वाला साहेबांनी हेतु दाखविले. एफ डी ओ डिपार्टमेंटतर्फे शहरी प्रशांत काथेपुरी यांनी आपले भाषणात सांगितले की,आम्ही मालेगाव शहराचे सर्व दिव्यांगला एफ डी ओ कडुन प्रत्येक सहायता केली जाईल तर तिथेच इस्लामपुरा वार्डाचे सचिन शिंदे साहेबांनी केशरी ते पिवळा झालेले रेशन कार्डाची महत्वावर रौशनी टाकली. मालेगांव रॉकेल युनियनचे अध्यक्ष शेख निसार राशन वाला साहेबांनी आपले भाषणात सांगितले की, मी रेशन युनियन चा अध्यक्ष असल्याने शहराची सर्व रेशन दुकानांशी अपील करणार की एका दुकानावर किती ही गर्दी असो सर्वाने प्रथम अपंगांना धान्य देण्यात यावे. त्यानंतर ही कोणी अपंगांना काही त्रास असेल तर मला फोन करावे. तसेच अपंगांशी हमर्ददी करतांना निसार भाई रेशन वाला तर्फे 10 बेसाखी ची घोषणा ही करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणुन आलेले सिटी पोलिस स्टेशनचे पी.आय.श्री.घोसर यांनी आपले भाषणात दिव्यांग संस्थेची प्रशंसा करतांना म्हणाले की, शहराचे र्व अपंगांना प्रत्येक सहायता देण्याचे आश्वासन दिले. विशेष महानगरपालिके कडुन देण्यात आलेले ओपन स्पेशजे या दिवशी चर्चेचा विषय बनविलेला आहे, यांस विशेष सहायता देण्याचे सांगितले.

अध्यक्ष स्थानावर प्रवचन पेश करतांना लायेन्स क्लब चे सभापती श्री.राजु मामा दिव्यांग संस्थेचे कामांची प्रशंसा करतांना संस्थेचे लीगल अॅडव्हाईझर ॲड.मोमिन मुजीब साहेबांचा जिक्र करतांना सांगितले की, आमची कोणही समस्या असो आम्ही त्यांचे मार्गदर्शनाशिवाय पुढे जात नाही. या महत्व कार्यक्रमात दिव्यांग संस्थेचे लीगल अॅडव्हाईझर यांच्याकडुन अपंगंना दोन बैसाखी देण्यात आली व 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवसांची संधी वर ज्या 27 अपंगांनी रक्ताचे दान केले त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करणेस अॅड.सालिक अन्सारी, अख्तर हुसैन, रियाज़ अहमद उर्फ मामा व अयाज़ अहमद साहेबांचे कष्ट समाविष्ट राहीले. अनाऊंसिंग संस्थेचे अध्यक्ष मुदस्सिर रजा यांनी केले या वेळी दिव्यांग संस्थेची वर्कीग कमिटीचे सर्व सदस्य हजर होते.

तर्फे : अध्यक्ष व कार्यकारणी दिव्यांग एजुकेशन अन्ड वेलफेयर सोसायटी मालेगांव नोंदणीकृत.

پیج