दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा! लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना - Voice of Divyang

Followers

Advertisement

Slideshow

WhatsApp%20Image%202022-08-12%20at%201.41.21%20AM%20(2)

demo-image

दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा! लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना

 दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा! लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना
1711746505117


नवी दिल्ली: वृत्तसंस्था

'या' सूचनाही बंधनकारक

निवडणूक प्रचारात शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तींसाठी (दिव्यांगांसाठी) निवडणूक प्रचारातून लुळा, बेडा, आंधळा, मुका, एकाक्ष, फुटका, बहिरा, लंगडा, असे शब्द वापरू नयेत, अशा मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत.

असले शब्द वापरणे हा दिव्यांगांचा अपमान आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यात वरीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रचारादरम्यान होणाऱ्या नेत्यांच्या भाषणांसह समाजमाध्यमांतील पोस्ट, जाहिराती तसेच प्रचारपत्रिकांतील मजकुरातूनही तारतम्य पाळावे लागणार आहे.

• सर्व राजकीय पक्षांना आपापल्या संकेतस्थळांवरून आम्ही दिव्यांगांना अन्य लोकांप्रमाणे आदराने वागवतो, असे जाहीर करावे लागेल.

• लुळा, वेडा, आंधळा, मुका, एकाक्ष, फुटका, बहिरा, लंगडा शब्दांवर बंदी

• भाषणातून, सोशल मीडिया पोस्टमधून, प्रचारपत्रिकांतूनही मनाई

..तर ५ वर्षे कारावास

● कार्यकत्यांकरवी दिव्यांगांशी संपर्क साधायचा, तर संबंधित कार्यकत्यांना आधी या मार्गदर्शक सूचनांबाबत अवगत करावे.

दिव्यांगांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ च्या कलम ९२ अंतर्गत ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

• राजकीय पक्षांनी दिव्यांगांच्या तक्रारींसाठी पक्षांतर्गत विभाग स्थापन करावा.

दिव्यांगांना राजकीय पक्षांनी सदस्यत्व द्यावे. निवडणुकीतील त्यांचा सहभाग वाढेल, असे पाहावे. .

پیج